सुरुवात झाली एका क्षणापासून...
२०२१ मध्ये एके काळी संदीप साळुंके सर सातारा ते पुणे प्रवास करत होते. प्रवासादरम्यान महामार्गाच्या कडेला त्यांना एक अतिशय वयोवृद्ध आजी-आजोबा दिसले.
त्यांच्याकडे खाण्यासाठी काहीही नव्हते. डोक्यावर आधार नव्हता. सोबत कोणी नव्हते. आणि मदतीसाठी त्यांच्याकडे पाहणारेही कोणी नव्हते.
त्या क्षणी संदीप सरांनी त्यांना शक्य ती मदत केली. पण तो क्षण तिथेच संपला नाही... त्यातून एक विचार जन्माला आला — “ज्यांना आपलं म्हणावं असं कोणी नाही, त्यांच्यासाठी आपण कोणीतरी का होऊ नये?”
याच विचारातून Adarsh Pratishthan च्या माणुसकीच्या प्रवासाला सुरुवात झाली. २०२१ पासून सुरू झालेला हा प्रवास आजही त्याच माणुसकीच्या भावनेने पुढे सुरू आहे.